Menu Close

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवा !

देहलीच्या जंतरमंतर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी

  • बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करा !

  • चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला !

देहली : अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि त्यांचा आश्रयदाता पाक यांना धडा शिकवावा, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणारे बंगालचे ममता सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे, भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीन निर्मित वस्तूंवर बहिष्कार घालावा इत्यादी मागण्यांसाठी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बजरंग दाल, अखंड भारत मोर्चा, प्रवासी बंगीय समाज चित्तरंजन पार्क, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन, कावडिया सेना, अखिल भारतीय रामराज्य परिषद, भारत गोसेवा समाज, विश्‍वगुरु भारत परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

मान्यवरांचे विचार

१. श्री. संदीप आहुजा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखंड भारत मोर्चा : आज बंगालमध्ये जे घडत आहे, त्यामागे त्यांना तेथून बाहेर हाकलणे, हाच उद्देश आहे. त्यामुळे हिंदूंना त्यांची पलायनवादी मानसिकता सोडणे आवश्यक आहे.

२. अधिवक्ता शैलेंद्रकुमार जयस्वाल, उच्च न्यायालय : ‘मी हिंदु आहे’ आणि ‘मी भारत देशाचा भक्त आहे’, या भावना लुप्त झाल्या आहेत. त्या हिंदूंमध्ये परत जागृत करण्यासाठी आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येत आहे.

३. श्री. सुरेश मुंजाल, पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूंच्या विरोधात आहेत. त्यांच्यात ‘ममता’ नाही, तर ‘द्वेष’ भरला आहे. हे बंगालचे हिंदू कुठपर्यंत सहन करणार आहेत ? तेथील हिंदूंनी अन्यायाच्या विरोधात संघटित झाले पाहिजे.

४. श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था : बंगालमध्ये हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता ‘पुरस्कार वापसी टोळी ’ कुठे गायब झाली आहे ?, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

इतर मागण्या

१. साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या प्रकरणात गुंतवून ८ वर्षे कारावासात ठेवणारे आणि त्यांच्यावर भीषण अत्याचार करणारे पोलीस अधिकारी आणि षड्यंत्र रचणारे तत्कालीन शासनकर्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

२. नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या देहली विद्यापिठाच्या प्राध्यापिका नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.

३. आतंकवादाला प्रोत्साहन देणारे हिंदुद्वेष्टे डॉ. झाकिर नाईक आणि त्यांची प्रतिबंधित संस्था  ‘आय.आर.एफ्.’ यांच्यावर बंदी घालावी.

क्षणचित्रे

१. या आंदोलनाच्या वेळी चिनी उत्पादनाचा बहिष्कार करण्याचा संदेश देण्यासह या वस्तूंची होळी करण्यात आली.

२. एक व्यक्ती आंदोलनस्थळापासून वाहनाने जात असतांना थांबली आणि आंदोलनात सहभागी झाली. या वेळी तिने सांगितले की, आजपर्यंत मी अनेक आंदोलने पाहिली; परंतु इतके सुनियोजित आंदोलन प्रथमच पहात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *