कर्णावती (अहमदाबाद) : पाकने गुजरातनजिक असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेजवळून १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. त्यांच्या २ नौकाही जप्त केल्या असून त्यांना कराचीला नेण्यात आले आहे.
या घटनेच्या एक दिवसापूर्वीच भारताच्या तटरक्षक दलाने कच्छच्या जखाऊ तट येथून पाकच्या ११ मच्छिमारांना अटक केली होती. या कारवाईचा सूड म्हणून पाकने भारतीय मच्छिमारांना अटक केल्याचे समजले जाते.
सध्या ४४० भारतीय मच्छिमार पाकच्या विविध करागृहांमध्ये बंद आहेत. त्याचबरोबर अनुमाने ८६० नौकासुद्धा पाकच्या कह्यात आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात