शिवप्रेमींची आमदार श्री. नरेंद्र पवार आणि आमदार श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कल्याण : दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी, एका आठवड्याच्या आत या कामाला प्रारंभ करून १४ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करावे, अशी मागणी येथील शिवप्रेमींनी भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. निवेदन देतांना हिंदु महामंडल, श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘दुर्गाडी बुरुजांची पडझड झाली, तशी तिथे उभ्या असलेल्या धर्मांधांच्या घरांच्या भिंतींची झाली असती, तर काय झाले असते, याची कल्पनाच न केलेली बरी’, अशा शब्दांत कल्याण येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भावना व्यक्त केल्या. दुर्गाडीसाठी निधी न्यून पडू देणार नसल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. जगनाथ (अप्पा) शिंदे यांनीही विधानसभेत दुर्गाडीचे सूत्र तारांकित प्रश्न म्हणून मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात