भाग्यनगर : रुग्णालयातील मृतांचा आकडा कमी करण्यासाठी डॉक्टरांनी महामृत्यूंजय यज्ञ केला. वरिष्ठ डॉक्टरसह स्टाफ मेंबरनी हैदराबादमधील गांधी हॉस्पिटलमध्ये हा यज्ञ केला.
अकाली मृत्यू रोखण्यासाठी महामृत्यूंजय यज्ञ करण्याचा उल्लेख वेदांमध्ये आहे. त्याला अनुसरुन रुग्णालयातील गर्भवती आणि त्यांच्या बाळांचे मृत्यू थांबवण्यासाठी यज्ञ करण्यात आला. चार पुजारी, काही प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी होते.
स्थानिक मीडियाने हा प्रकार उचलून धरल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डॉक्टरांना यापुढे असे प्रकार थांबवण्याची ताकीद देण्यात आली आहे.
संदर्भ : एबीपी माझा