Menu Close

ना नमाज, ना जनाजा, लंडनमध्ये आतंकवाद्याचे प्रेत गुपचूप पुरले !

कुठे आतंकवाद्याला कोणत्याही धार्मिक रितीरिवाजाशिवाय पुरणारा इंग्लंड, तर कुठे आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेचेही उदात्तीकरण होऊ देणारा भारत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

खुर्रम शजाद बट्ट

लंडन : शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले. (कुठे आतंकवाद्याला स्मशानभूमी नाकारणारे राष्ट्रप्रेमी इंग्रज, तर कुठे आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित रहाणारे भारतातील धर्मांध ! – संपादक, संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३ जून या दिवशी येथील एका पुलावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात ७ जण ठार झाले होते, तर अनेक घायाळ झाले होते. या आक्रमणाच्या वेळी लंडन पोलिसांनी तीनही आतंकवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. या आक्रमणामागे पाकवंशीय खुर्रम शजाद बट्ट या आतंवाद्याचा हात होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *