Menu Close

मेवात (हरियाणा) येथे धर्मांधांकडून मंदिराचे पुजारी दांपत्य आणि ग्रामस्थ यांना अमानुष मारहाण

‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्‍यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मेवात : जिल्ह्यातील बीसरू गावामध्ये धर्मांधांनी मंदिराचे पुजारी, त्यांची पत्नी आणि इतर ५ ग्रामस्थ यांना मंदिराच्या आवारात अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे पुजारी दांपत्य आणि इतर गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. या घटनेचे वृत देण्याचे प्रसारमाध्यमांनी टाळले. (हिंदूंनी एखाद्या मुसलमान मौलवीला मारहाण केली असती, तर त्याविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी असहिष्णुतेचा टाहो फोडत त्या वृत्ताला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली असती; मात्र हिंदूंच्या अतिसहिष्णुतेमुळे त्यांना कोणी वाली नाही ! – संपादक)

१. सकाळी मंदिराच्या पुजार्‍यांची पत्नी मंदिराच्या आवारात पाणी भरण्यासाठी गेली असता त्यांना दोन धर्मांध तरुण देवतेच्या मूर्तीला अयोग्यरित्या स्पर्श करत असल्याचे दिसले.

२. पुजार्‍याच्या पत्नीने त्यांच्या कृतीस आक्षेप घेतला. त्यावर त्या धर्मांध तरुणांनी पुजार्‍यांच्या पत्नीशी गैरवर्तन करणे चालू केले. मंदिराच्या आवारात सेवा करणार्‍या पुजार्‍यांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या धर्मांधांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

३. धर्मांध तरुणांनी पुजार्‍याला तेथील काठ्यांनी मारहाण केली. तसेच अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर धर्मांधांनी पुजार्‍याच्या पत्नीच्या केसांना पकडून तिला ओढणे चालू केले. त्या वेळी काही हिंदु ग्रामस्थ पुजारी दांपत्याच्या साहाय्याला आले.

४. त्या दोघा धर्मांधांनी २० ते २५ धर्मांधांना मंदिराच्या आवारात बोलावले. या धर्मांधांनी पुजारी दांपत्य आणि तेथील हिंदु ग्रामस्थ यांना लोखंडी सळ्यांनी अमानुष मारहाण केली. धर्मांधांच्या या टोळीने याहूनही गंभीर परिणामाची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *