Menu Close

नवीन पनवेल : ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात विसपुते महाविद्यालय आणि चांगू काना ठाकूर विद्यालय यांना निवेदन

M_Sun1

नवीन पनवेल : ‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्‍चात्य कुप्रथा टाळून महान भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन तरूणांनी करावे, यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकुर विद्यालय, तसेच विसपुते महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

चांगू काना ठाकुर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सोनावणे गुरुजी यांनी, तसेच विसपुते महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनराज विसपुते यांनी निवेदन स्वीकारले. अशा प्रकारच्या कुप्रथा थांबायलाच हव्यात, असे मत प्राचार्य श्री. विसपुते यांनी व्यक्त केले. या वेळी समितीच्या सौ. गरूड, सौ. सुर्वे, सौ. आष्टेकर, सौ. पाटील, सौ. परब आणि सौ. बुगडे उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *