Menu Close

चिनी उत्पादनांच्या विरोधात ठाण्यात भाजपचे आंदोलन

ठाणे : स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, तसेच चिनी बनावटीच्या वस्तू नाकाराव्यात अशी मागणी करत काल ठाण्यात भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर ठाण्यातील दुकानदारांनी भविष्यात चीनच्या वस्तू विकू नये यासाठी विनंती देखील करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांमध्ये युद्ध होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कुठे तरी भारताला याचेच परिणाम भोगावे लागणार आहेत. याकरिता भारतातील नागरीकांनी केवळ स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी चिनी बनावटीच्या वस्तू घेऊ नयेत, अशा घोषणा देत, तसेच फलक घेऊन भाजपचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *