रायचूर (कर्नाटक) : ‘ग्रीन रायचूर’ या रायचूरच्या स्थानिक संघटनेच्या वतीने परिसर संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक रविवारी श्रमदान करून स्वच्छता केली जाते. या अभियानाला २३ जुलै २०१७ या दिवशी ५० आठवडे पूर्ण झाले. ‘ग्रीन रायचूर’च्या या अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. राघवेंद्र सहभागी झाले होते. ५० व्या श्रमदानाच्या निमित्ताने ‘ग्रीन रायचूर’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘ग्रीन रायचूर’चे अध्यक्ष श्री. कोंडा कृष्णमूर्ती, उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार शिवली, रायचूरचे भाजपचे प्रमुख श्री. एन्. शंकराप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात