Menu Close

केरळ : धर्मांतरासाठी हिंदु पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणी मुसलमान पती आणि सासू यांना अटक

केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघड

मुक्कम (केरळ) : इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने पोलिसांत केली होती. या तक्रारीच्या आधारे मुक्कम पोलिसांनी चेन्नामंगळुुर येथील तिचा पती अहमद नबील (वय २४ वर्षे) आणि सासू रमला (वय ६६ वर्षे ) यांना अटक केली. या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अभिलाश के.पी. यांनी दिली.

मी धर्मांतरास नकार दर्शवल्याने पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला होता. तसेच पतीचे काही नातेवाइकही माझा छळ करत होते, असे या हिंदु महिलने तक्रारीत म्हटले आहे. या हिंदु महिलेचे धर्मांतर करण्यासाठी मंजेरी येथील ‘इस्लामिक स्टडी सेंटर’मध्ये नेण्यात आले होते. या प्रकरणी ‘इस्लामिक स्टडी सेंटर’चीही चौकशी करण्यात येत आहे.

या हिंदु मुलीने छळाविषयी तिच्या आईवडिलांना कळवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हिंदु तरुणी अहमद नबील नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याच्याशी नोंदणी विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *