Menu Close

दोन सहस्त्र वर्षे ब्राह्मणांनी शूद्रांना शिकू दिले नाही ?

‘‘दोन सहस्र वर्षे ब्राह्मणांनी शूद्रांना शिकू दिले नाही, मुद्दामहून अशिक्षित ठेवले’’, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ब्राह्मणांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी याचा सर्रास उपयोग होतो. पण हे पूर्णतः असत्य आहे.

इस्ट इंडिया कंपनी सरकारने भारतात साम्राज्य स्थापन केल्यानंतर वर्ष १८२० ते १८४० या दरम्यान ब्रिटीश अधिकार्‍यांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सर्वेक्षण केले होते. धर्मपालजी द्वारा लिखित ‘द ब्युटिफुल ट्री’ या पुस्तकात सर्व सर्वेक्षणांचा सखोल अभ्यास उपलब्ध आहे. विशेषतः विल्यम अ‍ॅडम्स या ब्रिटीश अधिकार्‍याने केलेला ‘बंगाल आणि बिहार मधील भारतीय शिक्षण, वर्ष १८३५/३८’ (Vernacular Education in Bengal and Bihar १८३५/३८) सर्वेक्षण, सध्याच्या आपल्या अनेक समजुतींना चुकीचे ठरवते.

या सर्व सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी :

१. भारतातील शिक्षणपद्धती तत्कालीन ब्रिटीश पद्धतीपेक्षा सरस !

२. भारतातील साक्षरतेचे प्रमाण तत्कालीन ब्रिटनपेक्षा अधिक !

३. संपूर्ण भारतात साधारणतः प्रत्येक गावात एक याप्रमाणे ६ लाख पाठशाळा !

४. सर्व पाठशाळांमध्ये सर्व जातींचे विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत असत.

५. एकूण विद्यार्थ्यांमध्ये शूद्र जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक (४५ टक्के), ब्राह्मण २० टक्के आणि अन्य ३५ टक्के इतर जातींचे विद्यार्थी.

६. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार शैक्षणिक शुल्क (श्रीमंतांना अधिक, तर गरिबांना अल्प) !

७. काही शाळांमध्ये मुलींचीही उपस्थिती !

८. शिकवले जाणारे मुख्य विषय – वाचन, लेखन (प्रांतानुसार वेगवेगळ्या भाषा, अनेक ठिकाणी २ ते ३ भाषांचे शिक्षण) आणि बीजगणित.

कायदे आणि बंधने लादून ब्रिटिशांनी तत्कालीन भारतीय शिक्षणपद्धती हळूहळू नष्ट केली. त्यामुळे ‘ब्रिटीश आले, म्हणून आम्ही शिकलो’ म्हणणार्‍या हिंदुद्रोही नेत्यांच्या डोळ्यांत हे झणझणीत अंजनच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

(संदर्भ : अज्ञात)

ही सर्व सर्वेक्षणे आणि पुस्तके इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध असून, कोणालाही माहितीचा पडताळा करायचा असेल, तर करू शकता !

१. Education in pre-british India – Indianscience.org या संकेतस्थळाची मार्गिका : goo.gl/gZT9gi

२. Adams report on Vernacular Education in Bengal and Bihar १८३५/३८ – Archive.Org या संकेतस्थळाची मार्गिका : goo.gl/gGkxiJ

३. धर्मपाल लिखित ‘The Beautiful Tree’ – Archive.Org या संकेतस्थळाची मार्गिका : goo.gl/pC5fbu

ही सर्व सर्वेक्षणे ब्रिटीश अधिकार्‍यांनी केली असल्याने यामध्ये भारतियांच्या बाजूने कसलाही पक्षपात असण्याची संभावना नाही. तसेच सर्व सर्वेक्षणे तत्कालीन पत्रव्यवहारासकट Physically उपलब्ध असल्याने नाकारता ही येत नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *