Menu Close

२७ वर्षांत अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ आतंकवादी आक्रमणे

नवी देहली : मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संसदेत दिली. काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेवरून परततांना यात्रेकरूंच्या बसवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात ८ भाविकांचा मृत्यू झाला होता आणि २० हून अधिक जण घायाळ झाले होते. (पूर्वीचे राज्यकर्ते ईश्‍वर सेवा समजून यात्रेकरूंची काळजी घेत असत, तसेच जनताही निर्भयपणे यात्रा करत असत. आज मात्र गेली अनेक वर्षे अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमणे होत आहेत. अशा परिस्थितीत जनतेची काळजी घेता न येणे, ही लोकशाहीची निरर्थकता नव्हे का ? त्यामुळे आता संवेदनशील राज्यकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *