रणरागिणी शाखेच्या वतीने निवेदन
पुणे : विस्तारवादी चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढून भारताच्या भूभागावर दावा सांगत आहे. नुकतीच चीनने डोकलाम येथे हिंदूंची मानसरोवर यात्रा रोखून भाविकांची अडवणूक केली. या पार्श्वभूमीवर चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने जिल्हाधिकार्यांच्या नावे नायब तहसीलदार (गृह शाखा) नंदा परदेशी यांना देण्यात आले. ‘या संदर्भात जनसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे’, असे परदेशी यांनी सांगितले. याविषयी रणरागिणी शाखेच्या वतीने २३ जुलै या दिवशी मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा चौकात आंदोलनही करण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात