हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्र्ध्वजाचा मान राखा’ चळवळ
पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जुलै या दिवशी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या संदर्भात पाठपुरावा घेण्यासाठी २४ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार (सर्वसाधारण शाखा) मीनल कळसकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याचे कळसकर यांनी आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी धर्माभिमानी सौ. प्रतिमा पासलकर यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम चांगला ! – तहसीलदार
तहसीलदार म्हणाल्या, ‘‘हिंदु जनजागृती समितीचा हा उपक्रम चांगला आहे. याविषयी एक कृती समिती आपण गठीत करू, तसेच शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृह या ठिकाणी प्रबोधन करू. कागदी राष्ट्रध्वजांवरही प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करू.’’
क्षणचित्रे : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भात समितीच्या वतीने सिद्ध करण्यात आलेले फलकांची सूची सौ. मीनल कळसकर यांना दाखवल्यावर त्यांनी ‘ती सूची आम्हालाही द्या’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात