Menu Close

सांताक्रूझ येथील हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केल्याचा संशय

  • हिंदु युवक आणि मुसलमान युवती यांच्या प्रेमसंबंधाचे प्रकरण

  • तपासात पोलिसांकडून दिरंगाई

मुंबई : सांताक्रूझ येथील डवरीनगर येथे रहाणार्‍या अरविंद प्रजापती या हिंदु युवकाची प्रेमसंबंधातून काही धर्माधांनी हत्या केल्याचा अथवा त्याला हत्येस प्रवृत्त केल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली जात असून नातेवाइकांनी अरविंदचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. (या प्रकरणात युवक मुसलमान आणि युवती हिंदु असती, तर पोलिसांनी तपासात अशीच दिरंगाई केली असती का ? हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. अरविंद याचे आणि त्याच्यासह ८ वी पासून शिकणार्‍या वांद्रे येथील रेल्वे स्थानक परिसरात रहाणार्‍या एका मुसलमान युवतीसमवेत प्रेमसंबंध होते.

२. २२ जुलैला मुसलमान युवतीच्या भावाने बोलवले आहे, असे सांगून अरविंद वांद्रे येथे गेला. त्यानंतर तो घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाइकांनी वाकोला पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

३. त्यानंतर ‘आम्ही अरविंदला २-३ वेळा कानशिलात मारून सोडून दिले’, असे मुसलमान मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी मान्य केले. पोलिसांनी याची सखोल चौकशी न करताच त्यांना सोडून दिले. दुसर्‍या दिवशी अरविंदच्या नातेवाइकांनी तपासाविषयी विचारल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. (हिंदूंना साहाय्य न करणार्‍या असंवेदनशील पोलिसांचा हिंदूंना कधतरी आधार वाटेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. अरविंद याच्या १५ ते २० नातेवाइकांनी मिळून त्याचा शोध घेणे चालू होते. त्याच्या भावाला, ‘वांद्रे येथील रेल्वे स्थानकात २२ जुलैच्या रात्री ८ वाजून २६ मिनिटांनी रेल्वेसमोर धावत आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे, तसेच त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात असल्याचे समजले.’ मृतदेह पाहिल्यानंतर तो अरविंदचा असल्याचे त्याच्या भावाने ओळखले. (तपासातील पोलिसांनी पूर्ण करण्याच्या गोष्टी हिंदु युवकाच्या नातेवाइकांनी पूर्ण करणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. यानंतर अरविंदच्या मैत्रिणीच्या धर्मांध भावाची आणि त्याच्या मित्रांची पुन्हा चौकशी केल्यानंतर त्यांनी अरविंदला मारहाण करत वांद्रे रेल्वे स्थानकापर्यंत नेल्याचे मान्य केले, तसेच ‘खार येथे माझ्या बहिणीचा त्याने हात पकडल्याच्या कारणावरून मनात राग आहे’, असे त्याने सांगितले. (सत्य समोर आल्यानंतर तोंड उघडणारे धर्मांध ! जर अरविंदचा मृतदेह मिळाला नसता, तर धर्मांधांनी त्याला मारहाण करत रेल्वे स्थानकापर्यंत नेल्याचे कधीच मान्य केले नसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांनी अरविंदला ज्या मार्गावरून मारहाण करत नेले, त्या मार्गावर सीसीटीव्ही नसल्याने पुरावा शोधणे कठीण झाले आहे. (पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच यापुढे गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी प्रशासन वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील या परिसरात सीसीटीव्ही बसवणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

६. सध्या धर्मांधासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मूळ तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात असल्याने प्रकरण तेथे वर्ग करण्यात यावे, असे वांद्रे रेल्वे पोलिसांनी सांगितले; मात्र वाकोला पोलिसांनी यासाठी आरंभी टाळाटाळ केली. एकूणच वाकोला पोलिसांनी यात अक्षम्य वेळकाढूपणा करून निष्क्रियता दर्शवली.

७. अरविंदचे मामा उत्तरप्रदेश येथे जिल्हा न्यायाधीश असून ते मुंबईत आल्यानंतर त्यांचा समादेश घेऊन धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी अरविंदचे नातेवाईक प्रयत्न करणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *