Menu Close

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नूतन मंदिर समिती सदस्याच्या समक्षच कर्मचार्‍यांमध्ये मारहाण !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! मंदिरातील कर्मचारी भक्त असतील, तर मारामारीसारखे खालच्या स्तराचे प्रसंग घडणारच नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पंढरपूर : २३ जुलै या दिवशी सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात लक्ष्मीदर्शन घेतल्यावर श्री विठ्ठल मंदिरात जवळच्या मार्गे भाविकांना सोडण्याच्या कारणावरून कर्मचार्‍यांमध्ये नवनिर्वाचित मंदिर समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीतच हाणामारी झाली. या सर्व प्रकाराचे क्लोज सर्किट कॅमेरामध्ये चित्रीकरण झाले आहे. (अशा प्रकारे स्वतःच मारामारी करणारे कर्मचारी भक्तांच्या गर्दीचे सुनियोजन कसे करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार डॉ. अतुल भोसले यांनी २१ जुलै या दिवशी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मंदिरातील धोरण घोषित केले. स्वच्छता, पावित्र्य, कर्मचार्‍यांची आचारसंहिता यांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच चुका करणार्‍यांवर कडक कारवाई करू, असे त्यांनी या वेळी सांगितले होते.

त्यामुळे आता या मारामारी करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *