जळगाव : चोपडा तालुक्याचे तहसीलदार श्री. दीपक गिरासे आणि नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनावणे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी त्यांना ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ तसेच ‘गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकती पाहिली. समितीच्या कार्याविषयी ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आमचे या कार्याला नियमित सहकार्य असते आणि यापुढेही राहील. समाजात उत्सवाचा मूळ हेतू विसरून विकृती आणतात. तुम्ही करत असलेल्या जागृतीच्या कार्याची समाजाला आवश्यकता असून तुम्ही सर्व पुष्कळ मन लावून सेवा करता.’’ त्यांनी पाहिलेल्या ध्वनीचित्रचकतीतील सूत्र सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत सांगणार असल्याचे ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात