वणी (जिल्हा यवतमाळ) : येथील तहसील चौकात राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात योग वेदांत सेवा समिती, गुरुदेव सेवा मंडळ आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनानंतर उपविभागीय कार्यालयात निवेदने देण्यात आली. निवेदने देतांना सर्वश्री पुंडलिक मत्ते, मधुकर भोयर, संजय पांडे, लोभेश्वर टोंगे आणि लहू खामणकर उपस्थित होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमणे करणार्यांवर आणि आतंकवाद्यांना आश्रय देणार्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी.
२. वारंवार भारताच्या सीमेवर घुसखोरी करून युद्धाची धमकी देणार्या चीनच्या विरोधात व्यापारी निर्बंध लावावेत.
३. बंगालमधील धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे आणि अत्याचार होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणार्या ममता बॅनर्जींचे सरकार हटवून राष्ट्र्रपती राजवट लावावी.
४. साध्वी प्रज्ञासिंह यांना छळणार्या पोलिसांवर आणि त्यांना आदेश देणार्या तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी.
५. धर्मांध डॉ. झाकीर नाईक याचे फेसबूक खाते बंद करावे.
क्षणचित्रे
१. स्थानिक तिन्ही वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाचे चित्रीकरण करून कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली.
२. एरव्ही पत्रकार बोलावूनही यायचे नाहीत. या वेळी ४ वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी प्रसिद्धीपत्रक स्वतःहून मागून नेले.
३. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. आंदोलन संपून कार्यकर्ते घरी पोहोचल्यानंतर पाऊस चालू झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात