सांगली : सोलापूर येथून बैठका संपवून पू. संभाजीराव भिडेगुरुजी लातूर-कोल्हापूर बसने सांगली येथे येत होते. पहाटे ४.३० वाजता बस कुची (तालुका-कवठेमहांकाळ) जवळ आल्यावर बसचालकाला काहीतरी होत असल्याचे पू. गुरुजींना जाणवले. प्रसंगावधान ओळखून पू. गुरुजींनी चालकाला तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले. चालकाने बस बाजूला घेतल्यावर अर्धांगवायूचा झटका आल्याचे लक्षात आले. बस कडेला घेतल्याने प्रवासी आणि चालक श्री. मोहन चंदनशिवे यांचे प्राण वाचले. अर्धांगवायूचा झटका आलेला बसचालक आणि प्रवासी यांना साहाय्य करणारे ऋषीतुल्य पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे आगळे रूपच पहावयास मिळाले !
२. पहाटे ४.३० वाजता चालकाला काहीतरी होत असल्याचे जाणवल्यावर पू. गुरुजींनी बस कडेला घ्यायला सांगितली. अचानक गाडी थांबल्याने प्रवासी जागे झाले. पू. भिडे गुरुजी यांनी एका प्रवाशाच्या भ्रमणभाषवरून कवठेमहांकाळचे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष श्री. प्रदीप शिंदे-सरकार यांना संपर्क करून या घटनेची कल्पना दिली.
३. श्री. शिंदे यांनी तात्काळ धारकरी सर्वश्री प्रवीण देसाई, रोहित जाधव, निलेश पोतदार, पवनपुत्र रणजीत मानेे यांना बोलावून रुग्णवाहिकेतून चालकाला शासकीय रुग्णालयात पाठवले. पू. गुरुजींनी मिरजेचे धारकरी सर्वश्री विनायक माईणकर, प्रमोद धुळूबुळू, नितीन चौगुले यांना तातडीने मिरज येथे जाऊन चालकाला साहाय्य करण्यास सांगितले.
४. सकाळी सभा-बैठका असल्यामुळे पू. गुरुजींना श्री. प्रदीप यांनी ‘सांगलीला सोडतो’, असे सांगितले. यावर पू. गुरुजी यांनी ‘इतर प्रवाशांचे काय ? त्यापेक्षा आगारप्रमुखांना दूरभाष करून दुसरा चालक मागवा’, असे सांगितले. दुसरा चालक आल्यावर प्रवाशांच्या समवेत त्याच बसने पू. गुरुजी सांगलीला आले.
५. चालकाची स्थिती लक्षात आली नसती, तर कदाचित बसचा अपघात होऊ शकला असता आणि प्रवाशांच्या प्राणावरही बेतू शकले असते; मात्र सतत राष्ट्रभक्तीच्या अनुसंधानात असणार्या पू. गुरुजींनी ते वेळीच ताडले आणि प्रसंग हाताळत योग्य ती उपाययोजना केली तसेच चालकासह प्रवाशांचेही प्राण वाचवले !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात