Menu Close

देशविरोधातील प्रवृत्ती ठेचून काढू ! – शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

देशद्रोही वक्तव्य करणार्‍या अबू आझमी यांचा पुतळा शिवसैनिकांना जाळला !

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही, असे बेताल देशद्रोही वक्तव्य करते, अशी देशद्रोही प्रवृत्ती ठेचून काढू, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वन्दे मातरम् म्हणणार नसल्याचे वक्तव्य केल्याच्या विरोधात शिवसेनेने त्यांचा पुतळा जाळला. त्या वेळी श्री. क्षीरसागर बोलत होते. या वेळी जय भवानी जय शिवाजी, अबू आझमीचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या.

श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, मृत्यूनंतर याच भूमीत दफन व्हायचे आणि कफनाचे कापडही याच देशाचे वापरायचे, असे असतांना अशी बांडगुळे देशविरोधी वक्तव्ये करून समाजात जाणीवपूर्वक दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. येणार्‍या अधिवेशनात अबू आझमीचे निलंबन करण्याची मागणी करू.

या वेळी नगरसेवक श्री. अभिजित चव्हाण, माजी नगरसेवक श्री. राजू हुंबे, हिंदु एकताचे श्री. चंद्रकांत बराले, श्री. अण्णा पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधूकर नाझरे, श्री. सुधाकर सुतार, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, शिवसेनेचे श्री. जयवंत हरुगले, सर्वश्री सुनील जाधव, रणजीत जाधव, दीपक घाटगे, नीलेश गायकवाड, सौ. सुवर्णा पोवार, मनोहर सोरप, सौ. रश्मी आडसूळ, मारुति मिरजकर यांसह अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *