Menu Close

अकोला येथे राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

अकोला : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा, बंगालचा बांगलादेश होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू करा, तसेच चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात गोरक्षण समिती, भारतमाता क्रांती आश्रम ट्रस्ट, सनातन संस्था या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. धर्माभिमानी श्री. संजय ठाकूर यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

भारतमाता क्रांती आश्रम ट्रस्टचे डॉ. शंकरराव सांगळे यांनी जनतेला स्वाक्षरी करून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी येत्या रक्षाबंधनाला स्वदेशी राख्याच विकत घ्या, असेही सांगितले. गोरक्षण समितीचे श्री. प्रशांत पाटील यांनी घोषणांद्वारे जनतेला राष्ट्रकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

क्षणचित्र

जनतेने मोठ्या प्रमाणात स्वाक्षर्‍या करून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *