अंबरनाथ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात युुद्ध होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, तसेच देशवासियांनीही चिनी वस्तू आणि चिनी राख्या यांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी केले. अंबरनाथ येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात त्या बोलत होत्या.
आंदोलनात राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे श्री. चेतन नामे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कु. सिद्धी सााळवी, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे (संस्थान) वरिष्ठ सल्लागार श्री. नारायण हिंदुराव, डेक्कन एज्युकेशन स्कूलचे संस्थापक श्री. वसंतन, उत्कर्ष महिला मंडळाच्या सौ. संगीता आवटी, गावदेवी मंदिर समितीचे श्री. अनिल भोईर, सौ. मीनाक्षी भोईर, रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
श्री. वसंतन, डेक्कन एज्युकेशन स्कूलचे संस्थापक : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनाला संघटित होऊन विरोध करायला हवा. चिनी राख्या आणि वस्तू यांवर बहिष्कार हीच सैनिकांना रक्षाबंधनाची खरी भेट असेल.
कु. सिद्धी साळवी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : जय जवान, जय किसान घोषवाक्य असलेल्या भारतातील किसान आणि जवान चीनमुळे अडचणीत आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबली, तरच आपण शत्रूला धडा शिकवू शकतो.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्र : एका महिलेने आंदोलनात सहभागी होऊन चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात