चिनी ड्रॅगनला ठेचण्यासाठी दादर (मुंबई) आणि पनवेल येथे रणरागिणींचे आंदोलन
मुंबई : चीन हा भारताचा सर्वांत धूर्त शत्रू आहे. वर्ष १९६२ मध्ये हिंदी चिनी भाई-भाई असे म्हणत त्याने भारताला दगा दिला होता. आता त्याला धडा शिकवण्याची नामी संधी आपल्याला मिळाली आहे. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्चय आणि कृती करूया. त्यामुळे चीनची आर्थिक नाकेबंदी होईल, असे प्रतिपादन शिवकार्य प्रतिष्ठानच्या सौ. राधिका सावंत यांनी केले. सीमेवर सातत्याने कुरापती करणार्या चीनला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक भारतियाने कंबर कसावी यासाठी रणरागिणी शाखा, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने २९ जुलैला दादर पश्चिम परिसरातील कबुतरखाना येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध संघटनांचे ६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
चीनला धडा शिकवून भारतभूमीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया – कु. स्वप्नाली जाधव आणि कु. कावेरी मयेकर, शिवकार्य प्रतिष्ठान
भारतीय सैनिक पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांच्या सैनिकांशी आणि आतंकवाद्यांशी दिवसरात्र प्राणपणाने लढत आहेत. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. सैनिकांना आपलेच काही नेते बलात्कारी संबोधून त्यांची अवहेलना करतात. त्यामुळे शत्रूराष्ट्राला धडा शिकवण्यासाठी ही नेतेमंडळी काही करतील, अशी अपेक्षा न बाळगता आपण प्रत्येकाने चिनी उत्पादने आणि राख्या यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. शाळेत आपण प्रतिदिन राष्ट्रगीत म्हटले आहे. ते कृतीमध्ये आणण्याची वेळ आता आली आहे. चीनला धडा शिकवून भारतभूमीच्या प्रती समस्त भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त करूया.
पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे युवकांना आवाहन करावे ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा
क्षणचित्रे
१. धर्मप्रेमी श्री. सचिन गायकवाड आणि सौ. मीना गायकवाड हे बदलापूर येथून केवळ आंदोलनासाठी आले होते.
२. आंदोलन पाहून सौ. सुरेखा हिंदळेकर स्वतःहून आंदोलनात सहभागी झाल्या. समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या कुरापती काढणार्या चीनला भारतीय महिला रणरागिणी होऊन धडा शिकवतील – सौ. नंदिनी सुर्वे, रणरागिणी शाखा
पनवेल : भारतीय महिला चंडी-दुर्गेची वंशज आहे. चीन भारताच्या कुरापती काढेल आणि आम्ही महिला चिनी राख्या भावांना बांधू, असे कदापी होणार नाही. चीनने लक्षात घ्यावे की, भारत सदैव अजिंक्य आहे आणि अजिंक्यच राहील. चीन भारताच्या कुरापती काढणार असेल, तर भारतीय महिला रणरागिणी बनून चीनला धडा शिकवतील, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ नंदिनी सुर्वे यांनी केले. नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तू खरेदीवर बहिष्कार घालून, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा आणि चीनची आर्थिक नाकेबंदी करावी या मागण्यांसाठी येथे रणरागिणी शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मोहिनी मांढरे आणि सनातन संस्थेच्या सौ. वंदना आपटे यांनीही त्यांचे विचार मांडले. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलन पहाणार्या नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनाला खांदा वसाहत, पनवेल येथील नगरसेविका सौ. सीताबाई पाटील याही उपस्थित होत्या.
क्षणचित्रे
१. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून २४ सहस्र लोकांपर्यंत हा विषय पोहोचला, तसेच ८ सहस्र जणांनी हे आंदोलन थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिले.
२. १०३ नागरिकांनी आंदोलन पाहून आम्ही चिनी वस्तू वापरणार नाही, असे सांगितले.
३. रस्त्यावरून जाणार्या अनेक महिला थांबून विषय जाणून घेत होत्या, तसेच उत्स्फूर्तपणे घोषणाही देत होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात