Menu Close

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

कावडियांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बैठकीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

वाराणसी : श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली. सहारनपूरच्या कुतुबशेर भागात कावड यात्रेकरूंच्या मार्गावर मांसाचे तुकडे टाकण्यात आले होते. देवबंद येथे कावड यात्रेकरूंच्या गाडीच्या खाली एका मुसलमान तरुणाने आत्महत्या केली. याद्वारे कावडयात्रेकरूंनी त्याची हत्या केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र या घटनेचे चित्रीकरण करण्यात आल्याने सत्य समोर आले. या सर्व घटनांतून कावड यात्रेकरूंना अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटना रोखण्यासाठी आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करून कावड यात्रेकरूंना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली.

अमरनाथ यात्रेला कडक सुरक्षाव्यवस्था असतांनाही १० जुलैला यात्रेकरूंवर आक्रमण झाले. यात ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले होते. यामुळे पुन्हा असे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये म्हणून पाक आणि काश्मीरमधील आतंकवादी यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारच्या मागण्या करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्याचेही ठरवण्यात आले.

 क्षणचित्रे

१. सर्व हिंदुत्वनिष्ठांनी प्रत्येक १५ दिवसांनी एकदा भेटून धर्मकार्य करण्याचा विचार करण्याचे ठरवण्यात आले.

२. दोघा हिंदुत्वनिष्ठांनी १५ ऑगस्टच्या वेळी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी  ५०० प्रबोधन पत्रक प्रायोजित करण्याचे मान्य केले.

३. रक्षाबंधनाच्या वेळी सर्वांनी त्यांच्या बहिणींना लव्ह जिहाद हा ग्रंथ भेट देण्याचेही या वेळी ठरवण्यात आले.

वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

वाराणसी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले. हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत हिंदु जनजागृती समितीकडून कावड यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन वाराणसीचे जिल्हाधिकारी श्री. योगेश्‍वर राम मिश्र यांना देण्यात आले. या वेळी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता अरूण मौर्य, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता राजेश कुमार पाण्डेय, अधिवक्ता ग्यानप्रकाश राय, हिंदु जागरण मंचाचे श्री. रवी श्रीवास्तव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभू, हिंदु धर्माभिमानी श्री. वीरेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणारे बंगाल सरकार त्वरित विसर्जित करावे आणि तेथील हिंदूंचे रक्षण करावे, चिनी साहित्यांवर बहिष्कार घालावे, निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपांखाली ८ वर्षे कारागृहात ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, नक्षलवादी कारवायांत सहभागी असणार्‍या देहली विश्‍वविद्यालयातील प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्यावर कारवाई करावी, डॉ. झाकीर नाईक यांचे फेसबूक खाते बंद करण्यात यावे आदी मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *