Menu Close

रोहतक (हरियाणा) : धर्मांधाने हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले !

  • हिंदु तरुणीला ३ मास बंदी बनवले

  • धर्मांतर आणि विवाह करण्याचा प्रयत्न

Love_jihad_M

रोहतक (हरियाणा) : येथे नवीद अहमद या धर्मांधाने एका हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले. तिला ३ मास बंदी बनवले आणि धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला. यासाठी नकार दिल्यावर तिला अमानुष यातना देण्यात आल्या. पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून नवीदच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे; मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.

१. येथील आर्यनगरमध्ये रहाणारा नवीद अहमद अनेक दिवसांपासून पीडितेला त्रास देत होता.

२. गेल्या मार्चमध्ये त्याने फूस लावून तिला नांगलोई येथे नेले. तेथे तिच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या घेतल्या.

३. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने बलपूर्वक स्वतःच्या घरी नेऊन तिला बंदी बनवले.

४. कालांतराने तिच्या लक्षात आले की, ज्या कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या होत्या, ती कागदपत्रे विवाह आणि धर्मांतर यांच्याशी संबंधित होती.

५. पीडितेने सांगितल्यानुसार ती अनुमाने ३ मास नवीद अहमदच्या घरी बंदीस्त होती. त्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली आणि स्वत:च्या घरी पोहचली.

६. त्यानंतर नवीनकडून लागोपाठ तिला धमक्या देण्यात येत आहेत. याप्रकरणी रोहतक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *