Menu Close

पुणे येथे अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या विरोधात आंदोलन

पुणे : मला देशाबाहेर हाकलले अथवा गोळी घातली, तरी मी वन्दे मातरम् म्हणणार नाही, असे वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एम्आय एम चे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रभक्त युवकांनी समस्त हिंदु आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. वन्दे मातरमच्या घोषणा देत आझमी आणि पठाण यांना देशाबाहेर हाकला, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ३० जुलै या दिवशी येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीच्या समोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, विश्‍व हिंदु महासंघाचे श्री. हेमेंद्र जोशी, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, श्री. आशिष वरंगटे, राष्ट्रनिर्माण संघटनेचे श्री. दयावान कुमावत आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *