Menu Close

इटलीमध्ये मुसलमान शरणार्थींना प्रवेश देण्यावर बंदी घाला ! – रोमच्या महापौरांची सरकारकडे मागणी

रोम शहराच्या महापौर व्हर्जिनिया रॅगी

रोम (इटली) : रोम शहराच्या महापौर व्हर्जिनिया रॅगी यांनी शहरात येणार्‍या विस्थापित मुसलमान शरणार्थींना त्यांच्या देशात प्रवेश देण्यावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी इटली सरकारकडे केली आहे. रोमवर आक्रमण करण्याचे इसिसचे लक्ष्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

इटलीच्या सरकारला निषेधार्थ पाठवलेल्या पत्रात महापौर व्हर्जिनिया रॅगी यांनी शहरात होणारे स्थलांतर ताबडतोब बंद करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, मला मुसलमानांचे वाढते स्थलांतर धोकादायक वाटते. त्यांच्यासाठी अधिक निवासव्यवस्था करणेही शक्य नाही. (भारतातील एकातरी महापौरांनी देशातील बांगलादेशी घुसखोरांविषयी अशी मागणी सरकारकडे केली आहे का ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात)

रोम येथे व्हॅटिकनचे मुख्यालय आहे आणि त्याच्यावर आक्रमण करून विजय मिळवणे हे इसिसचे लक्ष्य आहे. इसिसने त्याच्या जाहीरनाम्यात याचा स्पष्ट उल्लेख करून व्हॅटिकनवर आक्रमण करण्यासाठी व्यूहरचना सिद्ध केली आहे.

१ जानेवारी २०१६ या दिवशी इटलीने प्रकाशित केलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी रोममध्ये ३ लक्ष ६४ सहस्र ६३२ परदेशी जन्मलेले मुसलमान विस्थापित म्हणून नोंदणीकृत झाले होते. रोम शहराची एकूण लोकसंख्या केवळ ४३ लक्ष ५० सहस्र आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *