बजरंग दलाकडून निषेध
जळगाव : येथील चित्रा चौकात बजरंग दलाच्या वतीने २९ जुलैला सायंकाळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एम्आयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मातृभूमीला वंदन न करणार्या धर्मांधांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. अबू आझमी आणि वारिस पठाण या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या प्रतिमा दहन करण्यात आल्या.
स्वराज्य निर्माण सेना आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे पोलिसांना निवेदन
आझमी आणि पठाण यांच्यावरील कठोर कारवाईसाठी पाठपुरावा घेण्याचे पोलीस अधिकार्यांचे आश्वासन
स्वराज्य निर्माण सेना आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधिकारी बच्चनसिंग यांना निवेदन देण्यात आले. ते म्हणाले, आझमी आणि वारिस पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा घेऊ. या वेळी सर्वश्री महेश सपकाळे, परेश सिनकर, चंचल ठाकूर, लीना बशीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात