Menu Close

पीके चित्रपटात आमीर खानने शिवाच्या मूर्तीचा अवमान केला होता, तसा मी केला, तर काय बिघडले ? – मूर्तीभंजकाचा प्रश्‍न

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे युवकाने शिवाची मूर्ती तोडली !

आझमगड (उत्तरप्रदेश) : पीके चित्रपटात आमीर खान याने भगवान शिवाच्या मूर्तीचा अवमान केला, तेव्हा कोणी एवढा गोंधळ घातला नव्हता. मग मी मूर्ती तोडली, तर एवढी आरडाओरड का करता ?, असा प्रश्‍न येथील शिवाची मूर्ती तोडणार्‍या मूर्तीभंजकाने विचारला आहे. त्यामुळे चित्रपटांचा समाजमनावर होणारा परिणाम पुन्हा एकदा समोर आहे.

२६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली. याची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी संपूर्ण परिसरात पसरली. त्यानंतर लोकांनी तात्काळ नवीन मूर्ती बसवावी आणि दोषींच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी आझमगड – वाराणसी मार्ग अडवून धरला. त्यानंतर ज्येष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या प्रयत्नानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. घटनेच्या दुसर्‍या दिवशी पोलिसांनी चंद्रकांत सरोज या युवकाला अटक केली. पोलिसांनी हा युवक मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *