रत्नागिरी : हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे, या उद्देशाने सनातनचे संत पू. वैद्य विनय भावे यांच्या मोर्डे गावातील घरी २१ जुलै या दिवशी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करण्यात आला. हा यज्ञ प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या यज्ञाचे यजमानपद श्री. विक्रम भावे यांनी, तर यज्ञाचे पौरोहित्य सनातनचे साधक-पुरोहित सर्वश्री पवन बर्वे, अवधुत मुळ्ये, कौशल दामले, नितीन अभ्यंकर आदींनी केले. या यज्ञसोहळ्यास प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी तथा माई नाईक, प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य प.पू. उल्हासगिरी महाराज आणि पू. वैद्य विनय भावे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
क्षणचित्रे
१. यज्ञज्वाळेत श्री हनुमानाच्या विविध रूपांचे दर्शन झाले.
२. दोन दिवस यज्ञसोहळा चालू असतांना वातावरण चैतन्यमय जाणवत होते.
पूर्णाहुतीनंतर पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार उपस्थितांनी श्री पंचमुखी हनुमानाच्या चरणी केलेली प्रार्थना
हे श्रीरामा आणि हे श्री पंचमुखी हनुमंता, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात येणारी सर्व विघ्ने अन् अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घ आयुष्य अन् आरोग्य लाभावे, त्यांच्या शारीरिक व्याधींचे निराकरण व्हावे, साधकांना धर्मकार्य करतांना येणार्या अडचणींचे निवारण व्हावे, साधकांमध्ये भावभक्ती वाढावी, धर्माभिमानी हिंदूंमध्ये साधनेची तळमळ वाढावी, सर्व हिंदूंमध्ये धर्मप्रेम वाढावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात