पाश्चात्य संस्कृतीची व्यर्थता पुन्हा एकदा उघड
मुंबई : मेणबत्ती फुंकर मारून विझवल्यामुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १ सहस्र ४०० टक्क्यांनी वाढते. या जंतूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, अशी माहिती अमेरिकेतील क्लेमसन विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. याविषयीचे संशोधन नुकतेच ‘जर्नल ऑफ फूड रीसर्च’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (पाश्चात्य संस्कृतीच्या वाटेला गेलेल्यांनी आतातरी शहाणे होऊन हिंदु संस्कृती अंगिकारावी, अशी अपेक्षा आहे ! – संपादक) प्राचीन ग्रीसमध्ये शिकारीची देवता असलेल्या आर्टेमिसच्या मंदिरात मेणबत्ती पेटवून त्यासमवेत केक आणण्याची पद्धत होती. मेणबत्तीचा धूर हा सदिच्छा आणि प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो, असा समज आहे. या परंपरेनुसार अनेक जण त्यांचा वाढदिवस केक सजवून आणि त्यावरील मेणबत्त्यांना विझवून साजरा करतात. जेव्हा व्यक्ती मेणबत्तीवर फुंकर मारते, तेव्हा मानवी श्वासातील बायोएरोसोलमधील जिवाणू केकच्या पृष्ठभागावर बसतात. एरोसोल केकवर गेल्याने हा धोका निर्माण होतो. संशोधकांनी मेणबत्तीवर फुंकर मारल्यानंतरचे केकचे नमुने घेऊन तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर जिवाणू आढळून आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात