-
लोकहो, अशा शीतपेयांवर बंदी घालण्याची केंद्रशासनाकडे मागणी करा !
वॉशिंग्टन : हॉवर्ड विश्वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनातून शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.
१. शीतपेय, डबाबंद फळांचा रस (ज्यूस) आणि आरोग्यवर्धक पेय (हेल्थ ड्रिंक) पिण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याबरोबरच इंसुलिनचा परिणाम अल्प होतो, तसेच व्यक्तीला मधुमेह आणि हृदयाशी निगडित आजार होतात.
२. अमेरिकेच्या टफ्ट्स विश्वविद्यालयाने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून शीतपेयांच्या व्यसनामुळे मधुमेह झाल्याने प्रतिवर्षी १ लक्ष ३३ सहस्त्र लोकांचा मृत्यू होतो, असे लक्षात आले आहे.
३. हृदयाशी निगडित आजारांमुळे सुमारे ४५ सहस्त्र आणि कर्करोगामुळे ६ सहस्त्र ५०० लोकांचा मृत्यू होतो. एकूण १ लक्ष ८४ लाख लोकांच्या मृत्यूला शीतपेयांचे व्यसन कारणीभूत आहे.
४. मधुमेह रोखण्यासाठी प्रयत्नशील डायबिटीज केअरने सुमारे तीन लक्षांहून अधिक लोकांच्या आरोग्यावर शीतपेय, बंद डब्यांमध्ये मिळणारी पेये आणि आरोग्यवर्धक पेयाचा परिणाम अभ्यासल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.
५. ही पेये व्यक्तीची हाडे, मांस-पेशी, दात, डोळे आणि मूत्रपिंडासाठी हानीकारक आहेत, असेही डायबिटीज केअरने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात