Menu Close

गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य कालावधीत घेण्याची मागणी

हिंदु जनजागृती समितीची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्ट या दिवशी असल्याने ऐन गणेशोत्सव काळात ही पोटनिवडणूक होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी पोटनिवडणूक आल्याने हिंदूंमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेे. गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य दिवशी घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या एका शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्री. नारायण नावती यांच्याकडे ही मागणी केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित आणि खजिनदार श्री. उदय मुंज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी आणि चिंबल येथील गणेशभक्त श्री. राज बोरकर यांची उपस्थिती होती.

हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात म्हटले आहे की,

१. गणेशोत्सव हा हिंदूंचा अत्यंत आस्थेचा आणि विशेषत: गोव्यात मोठ्या उत्साहाने अन् श्रद्धेने साजरा केला जाणारा उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या दोन आठवडे पूर्वीपासूनच हिंदू बांधव त्याच्या पूर्वतयारीमध्ये व्यस्त असतात.

२. उपजीविकेसाठी इतरत्र वसलेली कुटुंबे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूळ घरी एकत्र येऊन हा उत्सव एकत्रितपणे साजरा करत असतात. साक्षात् श्री गणेशदेवता आपल्या घरी वास्तव्यास येणार आहे, अशा भक्तीभावाने सर्व हिंदु कुटुंबे उत्सवासाठी आतुर असतात.

३. श्री गणेशाच्या स्वागतासाठी वास्तूंची रंगरंगोटी करणे, सजावट करणे, माटोळी बांधणे आणि श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी सिद्ध रहाणे, इत्यादी कार्यांत व्यस्त असतात.

४. गोवा येथे पूर्वी २५ जून २०१७ या दिवशी घेण्याचे घोषित केलेली पंचायत निवडणूक ख्रिस्ती समाजाचा सांजाव हा सण असल्याने १७ जून २०१७ या दिवशी घेतली होती. याशिवाय पश्‍चिम बंगालमध्ये मुसलमानांच्या रमझान सणाच्या काळात घेण्याचे घोषित केलेल्या निवडणुकांच्या दिनांकांमध्ये पालट केल्याचीही उदाहरणे आहेत.

५. अन्य पंथियांप्रमाणे हिंदूंच्या गणेशोत्सवाचाही विचार होणे अत्यावश्यक आहे. भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व धर्मियांना समभावाची वागणूक मिळणे न्याय्य ठरेल. भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी इतर समाजांच्या श्रद्धांची दखल घेऊन निर्णयात पालट करण्याची जी लवचिकता दाखवली, तशीच दखल हिंदूंच्या धार्मिक भावनांचीही घेतली जाणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *