Menu Close

शिकारीपूर (कर्नाटक) येथील तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

शिकारीपूर (कर्नाटक) : रा.स्व. संघाचे स्वयंसेवक शरत मडिवाळ यांच्या आणि यापूर्वी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आक्रमणातील आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावे आणि निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपांखाली ८ वर्षे कारागृहात ठेवणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून येथील तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हर्षवर्धन शेट्टी, सौ. कावेरी रायकर, विश्‍व हिंदु परिषदेचे तालुका उपाध्यक्ष श्री. प्रकाश, श्री कालपुरुष सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रघू व्ही., श्री. वीरेश आर्., श्री. मालतेश आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *