- अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचे असे विडंबन केले, तर चालेल का ?
- हिंदूंनी केलेल्या निषेधाला यश ! हिंदूंनो, तुमच्या देवतांचे विडंबन करण्याचे जगात कुणाचेही धाडस होणार नाही, असे संघटित बळ निर्माण करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नेवाडा (अमेरिका) : न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या इट्सी या संकेतस्थळावरून वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असलेले कमोड (टॉयलेट सीट) त्याच्या संकेतस्थळावरून हटवले आहेत. श्री गणेशाचे चित्र असलेल्या कमोडच्या संकेतस्थळावरील विक्रीविषयी जगभरातील हिंदूंनी तीव्र निषेध केला होता. इट्सीने श्री गणेश टॉयलेट सीट बाजारामधून हटवावे आणि हिंदूंची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी हिंदूंनी केली होती.
श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली होती. तसेच श्री गणेशाचे वाहन असलेल्या उंदराला कंगव्याच्या रूपात दाखवण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात