Menu Close

मडकई क्रॉस तोडफोड प्रकरणातील आरोपी झारखंडच्या नक्षली भागांतील रहिवासी

मडगाव : करंझाळे, मडकई येथील दफनभूमीतील क्रॉसच्या तोडफोडीच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी (वय २५ वर्षे) मूळचा झारखंड राज्यातील धनबादजवळील नक्षली भागात रहाणारा आहे. गोव्यातील तीन सदस्यीय पोलीस पथक त्याला कह्यात घेण्यासाठी झारखंड येथे रवाना झाले आहे.

पोलिसांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी फोंडा न्यायालयाकडून अटक वारंट घेतले आहे. आरोपी मागील दोन वर्षे मडकई येथील एका आस्थापनात कामाला होता. पोलिसांनी आरोपीसमवेत रहाणार्‍या दोन मित्रांची चौकशी केली आहे. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने क्रॉसची तोडफोड केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला कह्यात घेण्यासाठी झारखंड येथे गेलेले पथक सध्या धनबाद, झारखंड या भागात ठाण मांडून आहे. सध्या आरोपी एका रुग्णालयात उपचार घेत आहे आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने अनुमती दिल्यानंतर आरोपीला अटक करून गोव्यात आणण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *