इसिसचा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही, असे सांगणार्या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अबुधाबी (संयुक्त अरब अमिराती) : इसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही, अशी चेतावणी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. अन्वर महंमद गर्गश यांनी दिली आहे. (हिंदूंना असहिष्णु ठरवणारे सर्वधर्मसमभाववाले आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) संयुक्त अरब अमिरातीने आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या १२ भारतियांना अटक केली आहे. या सर्वांना भारताकडे प्रत्यार्पित करत त्यांनी वरील चेतावणी दिली आहे.
डॉ. अन्वर महंमद गर्गश पुढे म्हणाले,
१. आपल्या सर्वांनाच इसिसच्या धोक्याचा सामना करण्याची आवश्यकता असून त्यापासून कुणाचीही सुटका नाही.
२. प्रत्येक देशाला इसिसचा धोका आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करावी लागेल. जो देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करील, त्याला त्याचा फटका बसेल.
३. संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र शेख महंमद बिन झायद अल् नाहायन हे १० फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या भारत दौर्यावर येत आहेत. या भेटीत आतंकवादाच्या विरोधात द्वीपक्षीय सहकार्य बळकट करणे, हे महत्त्वाचे सूत्र राहील.
वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून भारतात इसिस सक्रीय ! – ऑल इंडिया तन्झीम उलेमा-ए-इस्लाम
भारतामध्ये इसिस हातपाय पसरू शकणार नाही, हा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा ऑल इंडिया तन्झीम उलेमा-ए-इस्लाम या संघटनेने खोडून काढला आहे. वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून भारतात इसिस सक्रीय असून राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून त्यांच्यावर बंदी घालायला हवी, असे या संघटनेने म्हटले आहे. आतंकवादाला विरोध करण्यासाठी या संघटनेच्या वतीने परिषद घेण्यात आली. मुसलमान तरुण धर्मांध होऊ नयेत, यासाठी मदरशांमधून देण्यात येणार्या शिक्षणाची चिकित्सा करायला हवी, तसेच सुफी तत्त्वज्ञानाला प्राधान्य द्यावे, असे विचार या परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आले. (यावर मोदी शासन गांभीर्याने विचार करून आवश्यक ती पावले उचलेल, अशी भारतियांची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात