जाज्वल्य असा भाषाभिमान-धर्माभिमान शिवसैनिकांमध्येच असल्याने ते हिंदूंना नेहमीच आधार वाटतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीड : बीड नगरपालिकेवर एम्आयएम् आणि काकू-नाना आघाडीच्या वतीने सोमवारी उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला होता. ३ ऑगस्ट या दिवशी धर्मप्रेमी शिवसैनिकांनी हा फलक फाडून फेकून दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी असतांना आक्रमकांची भाषा असलेल्या उर्दू भाषेत फलक लावण्याची अनुमती का ? त्यामुळे शिवसेनेने केलेली कृती अयोग्य ती काय ? – संपादक)
याविषयी अधिक माहिती अशी की…
१. बीड पालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष सभा बोलावण्यात आली होती. यात पालिकेच्या दर्शनी भागावर उर्दू फलक लावण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. यानंतर काकू-नाना आघाडी आणि एम्आयएम् यांचे नगरसेवक यांनी हा फलक लावला.
२. हे शिवसैनिकांना खटल्याने त्यांनी मुख्याधिकारी धनंजय जाळवीकर यांची भेट घेऊन उर्दू फलक हटवण्याची मागणी केली.
३. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन उर्दू फलक काढून फेकला, तसेच पटल आणि काच यांची तोडफोड केली.
४. पालिकेच्या छतावर काही नादुरुस्त दिवे आणि पथदिवेही ठेवण्यात आले होते. तेही खाली फेकून दिले.
५. शिवसेनेचे कार्यकर्ते निघून गेल्यावर पोलीस पोहोचले. परिस्थिती चिघळू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
६. याविषयी प्रशासनाने सीसीटीव्ही चित्रण पाहून तक्रार प्रविष्ट करण्यात येईल, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात