Menu Close

गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधनात्मक प्रदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार !

नगर : शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्‍या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी ९४२२२२९८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

१. उत्सवाच्या काळात चित्रपटातील अश्‍लील गाणी लावण्याऐवजी धार्मिक गीते, पोवाडे लावावेत, तसेच जनप्रबोधनासाठी प्रवचने आणि व्याख्याने यांचे आयोजन करावे, असे आवाहन समितीने केले आहे.

२. ऑर्केस्ट्रा, तसेच फॅशनड्रेस, लिंबू-चमचा, संगीतखुर्ची या स्पर्धांपेक्षा कुस्ती आणि सूर्यनमस्कार स्पर्धा, मारुति स्तोत्र, हनुमान चालिसा पठण यांचे आयोजन करावे, असे समितीच्या वतीने सुचवण्यात आले आहे.

३. धर्मसंस्कारांसह शूरत्व आणि वीरत्व निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य निष्ठेने करत असलेल्या आदर्श गणेशोत्सव मंडळांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे, अशा मंडळांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. आपापल्या मंडळात प्रदर्शनी लावण्यासाठी आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी वरील भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *