ठाणे : घरफोडी करणारे २ धर्मांध आणि चोरीचा माल विकत घेणार्या एका व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले. (अल्पसंख्यांक म्हणवणार्यांचे गुन्हेगारीत प्रमाण अधिक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
१. अन्वर हुसेन अब्दुल रशीद शेख, मोहम्मद अली मालिका शेख यांच्याकडून २४ वेगवेगळ्या भ्रमणभाष आस्थापनांचे भ्रमणभाष संच, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे, रबरी हातमोजे, तोंडाला लावण्यासाठी वापरण्यात येणारा मास्क, रेनकोट, दुचाकी आणि काळ्या रंगाची बॅग असा एकूण २ लाख ४० सहस्र रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. तो विकत घेणारा निजाम प्रधान यालाही कह्यात घेतले आहे.
२. २ धर्मांधांच्या पडताळणीत दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात १३ घरफोडीचे गुन्हे प्रविष्ट असून यापूर्वीही त्यांना कह्यात घेण्यात आले होते. शीव, वांद्रे येथील पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत प्रविष्ट झालेल्या गंभीर गुन्ह्यांत ते पोलिसांना हवे होते. (आरोपींना यापूर्वीच कडक शिक्षा झाली असती, तर पुन्हा ते गुन्हे करण्यास धजावले नसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात