Menu Close

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती विसर्जित करण्याच्या मागणीसाठी वारकर्‍यांचे भजनी आंदोलन !

पंढरपूर : शासनाने जाहीर केलेली मंदिर समिती बरखास्त करावी यासाठी समस्त वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना आणि सर्व वारकरी सांप्रदायिक संघटना यांच्या वतीने नामदेव पायरी ते महाद्वार घाट येथे तिसरे लाक्षणिक भजनी आंदोलन करण्यात आले.

ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर जळगावकर महाराज, सचिव ह.भ.प. मनोहर महाराज औटी, ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. बाळासाहेब आरफळकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. जोगदंड महाराज, ह.भ.प. शिवणीकर महाराज यांच्यासह अनेक वारकरी या वेळी उपस्थित होते. रामकृष्ण हरिच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

शासनाने जाहीर केलेली श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत वारकरी संघटना यापुढे विविध मार्गांनी राज्यभर आक्रमक पद्धतीने आंदोलन करील.

नवनिर्वाचित मंदिर समिती आम्हाला मान्य नाही ! – ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर

राज्य शासनाने जाहीर केलेल्या समितीत वारकरी संप्रदायातील केवळ दोघांचाच समावेश आहे. अध्यक्षांसह अन्य सदस्य राजकीय आहेत. त्यामुळे ही समिती आम्हाला मान्य नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *