* श्री अमरनाथ यात्रेचा अल्प केलेला कालावधी ५९ दिवसांचा करण्यात यावा !
* मध्यप्रदेशमधील भोजशाळेत केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा !
* व्हॅलेंटाईन डे मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करावा !
नवी देहली : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी पुन्हा ५९ दिवसांचा करण्यात यावा, तसेच मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा, व्हॅलेंटाईन डेच्या नावावर होणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयाच्या स्तरावर मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करावा, यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैदिक उपासना पीठ, सनातन संस्था, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आश्रम आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला मेरठ येथील हिंदू स्वाभिमानचे अधिवक्ता चेतन शर्मा, पूज्यपाद संतश्री आसाराम बापू आश्रमच्या प्रवक्त्या सुश्री नीलम दुबे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी संबोधित केले.
काश्मीरमधील श्री अमरनाथ गुफेमध्ये स्वयंभू निर्माण होणार्या शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी प्रतिकूल वातावरणात देश-विदेशातून लाखो हिंदू या ठिकाणी येतात. दुर्दैवाने श्री अमरनाथ श्राइन बोर्डाकडून यावर्षी २ जुलैला आरंभ होणार्या या यात्रेचा कालावधी ५९ दिवसांवरून ४८ दिवसांचा करण्यात येणे, हा हिंदूंवरील अन्याय आहे. त्यामुळे भाजपच्या शासनाने हा कालावधी पूर्ववत ५९ दिवसांचा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
क्षणचित्र
१. अधिवक्ता चेतन शर्मा मेरठहून आंदोलनासाठी देहली येथे आले.
२. आंदोलनाच्या पूर्वी पावसाने प्रारंभ केला होता; मात्र आंदोलनाच्या वेळी पाऊस थांबला आणि आंदोलन निर्विघ्नपणे पार पडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात