Menu Close

व्हॉट्स अ‍ॅपच्या गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करणार्‍या १३ धर्मांधांना अटक

नरखेड (जिल्हा नागपूर) येथे वन्दे मातरमवरून तोडफोड आणि मारहाण झाल्याचे प्रकरण

वन्दे मातरमवरून वाद निर्माण व्हायला हा पाकिस्तान आहे का ? शासनकर्ते वन्दे मातरमला होणारा विरोध मोडून काढणार कि न म्हणणार्‍यांचे लांगूलचालन करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नागपूर : नरखेड येथे व्हॉट्स अ‍ॅपवर वन्दे मातरमविषयी झालेल्या चर्चेमुळे गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करून चिकित्सालयाची तोडफोड करणार्‍या १५० ते २०० जणांच्या जमावापैकी १३ धर्मांधांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (शेकडोंचा जमाव येऊन तोडफोड आणि मारहाण करतो; मात्र केवळ १३ जणांवरच कारवाई होते, ही पोलिसांची निष्क्रीयता नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पावसाळी अधिवेशनात वन्दे मातरम् म्हणण्यावरून गदारोळ झाल्यानंतर नरखेड येथील हिंदूंनी याचा निषेध केला, तसेच व्हॉट्स अ‍ॅप गटावरून राष्ट्रीय गीत असल्याने प्रत्येकाने आपल्या नावाच्या पुढे वन्दे मातरम् असे लावूया, अशी गटात चर्चा चालू होती. गटातील काही धर्मांधांना याचा राग आला. (वन्दे मातरमचा धर्मांधांना राग येणे, ही अबू आझमी आणि वारीस पठाण यांनी घेतलेल्या भूमिकेचा परिपाक आहे. शासनकर्त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोहाची नाळ तोडणे आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. धर्मांधांच्या जमावाने गटाचे अ‍ॅडमीन डॉ. सुभाष वाघे यांना अमानुष मारहाण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढली. तसेच श्री. रामेश्‍वर शेंदरे या हिंदु सदस्याच्या घरावरही आक्रमण केले; मात्र पोलीस वेळीच पोहोचल्याने त्यांचा जीव वाचला. धर्मांधांनी त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. (आज वन्दे मातरममुळे हिंदूंचे जीव घेऊ पहाणारे उद्या तिरंगा फडकवण्यास विरोध करण्यासही मागे-पुढे पहाणार नाहीत. तसेच या घटनेतून केवळ हिंदु समाज राष्ट्रभक्त असल्याचे सिद्ध होत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. धर्मांधांनी डॉ. वाघे यांच्या चिकित्सालयाची तोडफोड करून पुष्कळ हानी केली. धर्मांधांमुळे श्री. रामेश्‍वर शेंदरे यांच्यासह येथील हिंदूंमध्ये भयाचे वातावरण आणि दहशत निर्माण झाली. (भयाखाली अल्पसंख्यांक आहेत कि बहुसंख्य हिंदू, हे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी सांगतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. यानंतर स्थानिकांनी मारहाण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. (याचा अर्थ हिंदूंनी जर मागणी केली नसती, तर पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई केली नसती, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याच वेळी वन्दे मातरमला विरोध असणार्‍यांनीही तेथे गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ शहरात बंद पाळण्यात येऊन ६ सहस्र जणांचा मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

५. शहबाज शफी सिद्दिकी, शाहजाद उपाख्य सलिम अब्दुल जब्बार कुरेशी, नावेद गफ्फार पठाण, ईस्ताक शेख ऊर्फ गोलू इंद्रिस शेख, तौसिफ शेख जाकीर, इमरान शेख इकबाल शेख, महमद शरीफ सिद्दीकी, शेख परवेज शेख सत्तार, सोहेब पठाण नसीर पठाण, इरशाद इकबाल राजवाणी, सलमान शेख इद्रीस शेख, उबेद जफर सिद्दीकी आणि जुनेद जफर सिद्दीकी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून डॉ. वाघे यांच्यावरही विशिष्ट समुदायाविषयी सामाजिक संकेतस्थळावर विवादास्पद संदेश प्रसारित केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (हा तर संन्यशालाच फाशी देण्याचा प्रकार आहे. देशभक्तीविषयी संदेश प्रसारित करणे, हा पोलिसांना गुन्हा वाटत असेल, तर हे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *