७ हून अधिक गोरक्षक घायाळ
गोरक्षकांवर होणार्या आक्रमणाविषयी कथित असहिष्णुतावाले आणि मानवाधिकाराचे गळे काढणारे आता गप्प का ? गोहत्याबंदीच्या कायद्याची प्रभावी कार्यवाही झाली असती, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती ! सरकार स्वतः गोवंशाचे रक्षण करत नाही आणि गोरक्षकांनाही करू देत नाही. त्यामुळेच धर्मांधांकडून गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत !
पुणे : गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ५ आगॅस्टला ५० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले. यामध्ये सर्वश्री उपेंद्र बलकवडे, केतन बसुतकर, प्रतीक गायकवाड, हेमंत देशमुख, आेंकार मानकर, सचिन जवळे आणि मंगेश नडे आणि अन्य गोरक्षक घायाळ झाले.
गोरक्षक १० बैल आणि २ गायी यांच्या हत्येसाठी अवैध वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या साहाय्याने अडवून यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर ५० धर्मांधांनी हत्यारे, लाठ्या-काठ्या आणि दगड घेऊन गोरक्षकांना मारहाण केली. या प्रकरणी ३० जणांविरुद्ध कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि कलम ३९५ (दरोडा) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून टेम्पोचा मालक वाहीद शेख आणि चालक राजू फतरूभाई शेख यांना महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रसंगी धर्मांधांनी काही गोरक्षकांच्या सोन्याच्या साखळ्याही चोरून नेल्या, असा आरोप श्री. स्वामी यांनी केला आहे. (गोरक्षकांनी केलेल्या कथित आक्रमणांना असहिष्णुतेची लाट म्हणणारे आता गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी गप्प का ? हिंदु धर्मीय गायीला देवता म्हणून पूजतात. गोरक्षक जीवाची पर्वा न करता गोरक्षणाची सेवा करतात. गोरक्षकांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होणे सरकारला लज्जास्पद होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात