Menu Close

Video : सूत्रसंचालिकेला मौलानाची धमकी, ‘मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यावर तुझ्या घरात घुसून नमाज पठण करू !’

सुदर्शन न्यूजच्या सूत्रसंचालिकेला चर्चासत्राच्या वेळी मौलानाची धमकी

मुसलमानांची लोकसंख्या जेथे वाढते तेथे काय होते, हे वेगळे सांगायला नको ! या धमकीनंतर तरी हिंदू जागृत होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : हिंदी वृत्तवाहिनी सुदर्शन न्यूजवर एका चर्चासत्राच्या वेळी सहभागी झालेल्या मौलानाने वाहिनीच्या सूत्रसंचालिकेला धमकी दिली. एकदा मुसलमानांची लोकसंख्या वाढली की, मग आम्ही तुझ्या घरात घुसून नमाज पठण करू आणि त्या वेळी कोणीच काही करू शकणार नाही, अशा शब्दांत या मौलानाने धमकी दिल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली; मात्र आता या संदर्भातील चित्रफीत सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारे कोणी हिंदु पाकिस्तानमध्ये बोलू शकतो का ?, असा प्रश्‍नही विचारण्यात येत आहे. तसेच भारत आणखी किती सहिष्णु बनणार आहे ?, असेही विचारण्यात येत आहे.

शेवटी हिंदूंना समानता कधी मिळणार? या विषयावर हे चर्चासत्र चालू होते. यात मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, प्रसिद्ध अधिवक्त्या प्रज्ञा भूषण आणि मौलाना अशरफ जिलानी हे सहभागी झाले होते, तर लावनी विनीत या सूत्रसंचालन करत होत्या. त्या वेळी मौलाना यांनी वरील धमकी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *