हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट
थिरुवनंतपुरम् : केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या अन् त्यांच्यावर होणारी आक्रमणे पूर्वनियोजित आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. केरळमध्ये गेल्या काही मासांपासून रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांच्या माकपकडून हत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ६ ऑगस्टला केरळला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या भेटीत त्यांनी हत्या झालेल्या राजेश या संघ कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच अन्य एका आक्रमणात घायाळ झालेल्या जयप्रकाश या कार्यकर्त्यांच्या घरीही ते गेले.
जेटली पुढे म्हणाले की, असे अमानुष कृत्य देशाचे शत्रूही कधी करत नाहीत. अशा भ्याड आक्रमणांंमुळे आमचे मनोबल आणखी वाढणार आहे. अशा घटना जर भाजपशासित राज्यांत झाल्या असत्या, तर पुरस्कार परत केले गेले असते, संसदेचे कामकाज रोखले गेले असते आणि देशभरात आंदोलने झाली असती. कोणतेही आक्रमण कोणाची विचाराधारा संपवू शकत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि येथील परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जेटली यांनी केली.
केरळमध्ये संघाच्या प्रचारकाला केंद्रशासनाकडून एक्स श्रेणीची सुरक्षाव्यवस्था
केरळ राज्यातील व्यक्तीला केंद्रशासन सुरक्षा पुरवते, हे केरळमधील कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील राजवटीला लज्जास्पद नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
थिरुवनंतपुरम् : केरळमध्ये होत असलेल्या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर संघाचे क्षेत्रीय प्रचारक शशिधरन् यांना केंद्रशासनाने एक्स श्रेणीची सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. त्यांच्या संरक्षणासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कर्मचारी असणार आहेत. काही दिवसांपूर्वी येथे राजेश या स्वयंसेवकाची एका टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments