Menu Close

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या आशयाचे नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन

नागपूर : येथील जिल्हाधिकारी श्री. सचिन कुर्वे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती करण्याविषयी आश्‍वासन दिले. राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

नागूपर पोलीस उपआयुक्तांना निवेदन दिल्यावर त्यांनी जिल्ह्यातील २९ पोलीस ठाण्यांत निवेदन पाठवू, असे सांगितले. (पोलिसांनी राष्ट्ररक्षणाच्या संदर्भात अशीच कृतीशीलता दाखवावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

(उजवीकडे) प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

गडहिंग्लज (कोल्हापूर) : येथील प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कुरणे आणि गटशिक्षण अधिकारी  जी.बी. कमळकर यांना १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून त्याचा मान राखावा, या मागणीचे निवेदन २ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अशोक शिंदे, संजय संकपाळ, विलास  पोळ, काशिनाथ गडकरी, रोहित पोवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज, सनातन संस्थेच्या सौ. रंजना पाटील उपस्थित होत्या.

या वेळी प्रांताधिकार्‍यांना कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रशासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंबंधी कारंजा येथे तहसीलदारांना निवेदन

कारंजा (यवतमाळ) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *