Menu Close

आसाम : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या जिहादी शिक्षकाला अखेर अटक

वासनांध शिक्षक फैजुद्दीन लष्कर

नवी देहली : सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर त्या शिक्षकाला काल अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात असलेल्या काटलीचेरा येथील शाळेत घडला आहे. येथील स्थानिक DY-365 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फैजुद्दीन लष्कर असे या शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत फोटोशूट केले होते. हे फोटोशूट करताना शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो काढले होते.

फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी त्यावेळी आरोपी शिक्षकाची फक्त चौकशी केली होती. मात्र काल अखेर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या शिक्षकाने विद्यार्थिनींना काय सांगून या अशा प्रकारे फोटोशूट केले होते. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. याचबरोबर, याआधीही या शिक्षकावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

स्त्रोत : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *