-
महिला आणि मुलांना मारहाण, तर काही महिलांचा विनयभंग !
-
बांगलादेशमध्ये हिंदुविरोधी जिहाद चालूच !
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशमधील कुरीग्राम जिल्ह्यातील भातीर्भिता या गावात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंची भूमी बळकावण्याच्या हेतूने ८-१० धर्मांधांनी एका वृद्ध हिंदु महिलेच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उधळून लावला. धर्मांधांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हिंदु महिला आणि मुलांना मारहाण केली, तसेच अनेक महिलांचा विनयभंगही केला.
अधिक माहिती पुढीलप्रमाणे –
१. स्थानिक हिंदु दिलीप चंद्र सेन यांच्या आईच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावर हे आक्रमण झाले.
२. या आक्रमणानंतर आरोपी आणि त्यांचे सूत्रधार फरार झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. महंमद इब्राहिम, अब्दुल मलेक, अब्दुल करीम, मैदुल इस्लाम, मलेका बेगम, हमीदा बेगम, अलेना बेगम आणि शरीफा बेगम अशी आरोपींची नावे आहेत. (धर्मांधांच्या खांद्यांना खांदा लावून लढणार्या त्यांच्या महिलांची चाल ओळखा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. हा संपूर्ण घटनाक्रम बांगलादेशमधील दैनिक जुगांतोर आणि दैनिक संगबाद मध्ये ७ फेब्रुवारीला छापूनही आला आहे.
४. सदर प्रकार कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कुरीग्राम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महंमद तोबारक उल्लाह यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या घटनेबद्दल माहिती नसल्याचे सांगून संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा घोष यांना सल्ला दिला. (हिंदूंवर झालेल्या आक्रमणाची घटना जगजाहीर होऊनही उडवाउडवीची उत्तरे देणार्या पोलिसांकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. त्यामुळे अधिवक्ता घोष यांनी नागेश्वरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अबू अक्कास अहमद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सदर घटना धार्मिक नसून वैयक्तिक भांडणातून घडल्याचे सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची आणि चौकशी चालू असल्याचे सांगितले. (बांगलादेशमध्ये हिंदूंवर वारंवार होणारी आक्रमणे पहाता, सदर घटनेला वैयक्तिक वैमनस्याचे रूप देऊन पोलीस धर्मांधांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतपत हिंदू दूधखुळे नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. अशाप्रकारे धार्मिक विधींवर आक्रमण करून महिलांचा विनयभंग करणार्या आणि मुलांना मारहाण करणार्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बांगलादेश मायनॉरीटी वॉच ने बांगलादेश शासनाकडे केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात