Menu Close

नांद्रा (जळगाव) येथील ग्रामस्थ धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करणार

नांद्रा ग्रामस्थांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घेऊन राष्ट्र आणि धर्म कार्यात योगदान द्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव : येथील नांद्रा गावातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि गणेश उत्सवातील धर्मशास्त्र या विषयावर समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या गणेशोत्सवाची ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. या वेळी गावातील १५० हून अधिक ग्रामस्थांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. काही मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. येथील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन लावण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच गावातील महिलांनी या काळात सामूहिक जप करण्याचा निश्‍चय केला आहे. (धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजर्‍या करणार्‍या नांद्रा (जळगाव) येथील ग्रामस्थांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *